सुखाकडे जाणारी वाट
गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रामाणिक नीतिवाद्यांमध्ये सुखाला, आनंदाला तुच्छ लेखण्याची, दूर ठेवण्याची (त्यापासून दूर पळण्याची म्हणाना!) चाल आहे. ‘सहनं परमो धर्मः’ मानणाऱ्या तितिक्षावादी (स्टोईक) लोकांनी सुखाचा उपदेश करणाऱ्या एपिक्युरसवर ‘हल्लाबोल’ केला. त्याच्या उपदेशाला ‘फालतू तत्त्वज्ञान’ म्हणून हिणवले आणि त्याच्याबद्दल नाही नाही त्या वंदता पसरवून आपला ‘वरचढपणा’ सिद्ध केला. ही तर प्राचीन गोष्ट म्हणून सोडून देऊ. …